१९९७ साली आलेल्या 'बॉर्डर'साठी कलाकारांना किती मानधन मिळालं होतं? अक्षय खन्नाला मिळालेले फक्त 'इतके' रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:19 IST2025-12-17T15:59:55+5:302025-12-17T16:19:54+5:30

१९९७ साली आलेल्या बॉर्डर सिनेमासाठी कलाकारांना किती मानधन मिळालं होतं? आकडा ऐकून धक्का बसेल

सनी देओलच्या 'बॉर्डर २' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचा टीझर काल रिलीज झाला आणि सनी देओलच्या भूमिकेची पुन्हा चर्चा झाली

'बॉर्डर २'मध्ये पाकिस्तानला धडकी भरवणारी सनी देओलची गर्जना सर्वांच्या मनात घर करुन राहिली आहे. 'बॉर्डर २' साठी सनी देओलने ५० कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.

'बॉर्डर २'साठी कोटींच्या घरात मानधन घेणाऱ्या सनी देओलला १९९७ साली आलेल्या 'बॉर्डर' सिनेमासाठी मात्र फार कमी मानधन मिळालं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओलला 'बॉर्डर'साठी १.२ कोटी रुपये मिळाले होते. सिनेमातील तब्बूला २० लाख रुपये तर जॅकी श्रॉफ यांना ११ लाख रुपये मिळाले होते

सध्या धुरंधर गाजवणारा अक्षय खन्नाही 'बॉर्डर'मध्ये झळकला होता. अक्षय खन्नाला त्यावेळी १४ लाख रुपये इतकं मानधन मिळालं होतं.

'बॉर्डर'साठी सुनील शेट्टीला सहा लाख, पूजा भटला १ लाख, कुलभुषण खरबंदा यांना ६ लाख तर पुनीत इस्सर यांना १० रुपये इतकं मानधन मिळालं होतं.

'बॉर्डर २' सिनेमा आता २०२६ ला भेटीला येणार आहे. सनी देओल पुन्हा एकदा जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे.