'सहकुटुंब सहपरिवार'च्या ज्योतीचा ग्लॅमरस अंदाज; शुटिंग सोडून 'या' ठिकाणी करतीये भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 07:41 PM2022-05-26T19:41:45+5:302022-05-26T19:44:59+5:30

Shweta mehendale: अलिकडेच श्वेताने तिचं फॅट टू फिट असं ट्रान्सफर्मेशन केलं आहे. त्यामुळे तिचा प्रत्येक फोटो सध्या चर्चेत येत असतो.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता मेहंदळे. सध्या श्वेता 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत श्वेता ज्योती ही खलनायिकी भूमिका साकारत असून या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून लोकप्रियता मिळत आहे.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्वेता दररोज तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच श्वेताने तिचे काही निवड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

सध्या श्वेता कोकणात असून येथील अनेक फोटो आणि रिल्स तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अलिकडेच श्वेताने तिचं फॅट टू फिट असं ट्रान्सफर्मेशन केलं आहे. त्यामुळे तिचा प्रत्येक फोटो सध्या चर्चेत येत असतो.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे श्वेताला खरी ओळख मिळाली. मात्र, यापूर्वी ती अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकली आहे.

'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 'धूम 2 धमाल', 'पाच नार एक बेजार', 'सगळं करुन भागलं', 'असा मी तसा मी', 'जावईबापू जिंदाबाद' अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.