सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

By देवेंद्र जाधव | Updated: June 6, 2025 14:38 IST2025-06-06T13:43:56+5:302025-06-06T14:38:59+5:30

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलगीही मनोरंजन विश्वात सक्रीय आहे हे फार कमी जणांना माहित असेल. रीमाने अमिताभ बच्चन, रितेश देशमुख यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलंय

सदाशिव अमरापूरकर आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका चांगल्याच गाजल्या. सदाशिव अमरापूरकर यांची मुलगीही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे, हे फार कमी जणांना माहित असेल

सदाशिव अमरापूरकर यांनी १९७३ साली सुनंदा करमरकर यांच्याशी लग्न केलं. सुनंदा आणि सदाशिव यांच्या मुलीचं नाव आहे रीमा.

सदाशिव यांची मुलगी रीमाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात काम केलं नसलं तरीही ती मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. याशिवाय तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय.

रीमा अमरापूरकरने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलंय. २००६ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी यांच्या 'बाबुल' सिनेमासाठी रीमाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.

याशिवाय २००७ मध्ये रितेश देशमुख, संजय दत्त, अर्शद वारसी यांच्या 'धमाल' सिनेमासाठी तिने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलं.

याशिवाय 'आरं आरं आबा आता तरी थांबा' या मराठी सिनेमासाठीही सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात रीमाचे वडील सदाशिव अमरापूरकर प्रमुख भूमिकेत होते

रीमा सध्या युट्यूबवर स्वतःचा पॉडकास्ट शो चालवत असून तिच्या या पॉडकास्टला मराठी सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रात काम करणारी माणसं हजेरी लावत असतात.