Rashami Desai : "मी पैशासाठी बिग बॉस केलं, आर्थिक संकट पाहिलंय"; रश्मी देसाईने सांगितला वाईट काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:58 IST2025-02-20T15:33:06+5:302025-02-20T15:58:20+5:30
Rashami Desai : रश्मीने आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या दिवसांची आठवण काढली.

'उत्तरन'मधून घराघरात लोकप्रिय झालेली रश्मी देसाई अलीकडेच 'हिसाब बराबर' चित्रपटात दिसली. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. रश्मीने आर माधवनसोबत स्क्रीन शेअर केली.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रश्मीने आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या दिवसांची आठवण काढली. तो अभिनेत्रीच्या आयुष्यातील एक वाईट काळ होता.
रश्मी म्हणाली- "मला माझे वाईट दिवस आठवायचे नाहीत. मी बऱ्याच गोष्टी झेलल्या आहेत आणि एकटीनेच त्या हाताळल्या आहेत."
"माझ्यासोबत हे सर्व घडत होतं तेव्हा मी ते कधीही कोणालाही सांगितलं नाही."
"मला बिग बॉसचा फॉरमॅट कधीच समजला नाही. मी तो शो फक्त पैशांसाठी केला होता. त्यावेळी मला पैशांची खूप गरज होती.
"मी बिग बॉस केल्याबद्दल मला आनंद आहे. कारण माझ्या आयुष्यातील काही चॅप्टर त्यानंतर पूर्ण झाले, नाहीतर वाईट वेळी त्याचा अंत झाला असता."
"कदाचित मी तुमच्या लोकांमध्ये नसते. मी बिग बॉस केलं हे फार चांगलं झालं आहे."
"२०१८, २०१९ आणि २०२० ही वर्षे माझ्या आयुष्यातील अशी वर्षे होती ज्यात मला काय चाललं आहे ते समजत नव्हतं" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
रश्मी देसाईचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.