रणदीप हुड्डाची पत्नी लिन लैशरामचं पार पडलं 'डोहाळे जेवण', ४० व्या वर्षी आई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:14 IST2026-01-27T15:05:17+5:302026-01-27T15:14:47+5:30
दोघांच्या जोडीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशराम यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.

नुकताच रणदीपची पत्नी लिन हिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पारंपरिक थाटात पार पडला. ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हा कार्यक्रम अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. केळीची पाने आणि झेंडूच्या फुलांनी संपूर्ण ठिकाण सजवण्यात आले होते.

लिनचा आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ओसंडून वाहत होता. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

या खास प्रसंगी लिन लैशरामने सुंदर साडी परिधान केली होती, ज्यामध्ये तिचा बेबी बंप उठून दिसत होता.

दोघांच्या जोडीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, प्रेग्नेंसीपूर्वी तिला एकदा मिसकॅरेजचा सामना करावा लागला होता.

रणदीप आणि लिन यांची लव्हस्टोरीदेखील फिल्मी आहे. दोघांची पहिली भेट ही ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या मोटली नावाच्या थिएटर ग्रुपमध्ये झाली होती.

या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २०२३ मध्ये मणिपुरी परंपरेनुसार या जोडीने लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

रणदीप आणि लीन २०१६ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. रणदीपपेक्षा ती १० वर्षांनी लहान असल्याचं बोललं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, लीन ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

लीन ही प्रियंका चोप्राच्या 'मेरी कॉम' या सिनेमात झळकली होती. तसंच तिने 'रंगून', 'उमरिका' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर शाहरुखच्या ओम शांती ओम या सिनेमातही तिने स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच ती करिना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमात झळकली होती.

















