पूनम पांडेला 'कॅन्सर'ने हरवलं, पण 'हे' 5 सेलिब्रिटी कर्करोगावरही पडले भारी, पाहा कोण-कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 05:33 PM2024-02-02T17:33:50+5:302024-02-02T17:52:43+5:30

पूनम पांडेचा अवघ्या ३२व्या वर्षी कॅन्सरमुळे अचानक झाला मृत्यू

Poonam Pandey Death, Cervical Cancer: लोकप्रिय मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला. अवघ्या ३२व्या वर्षी सर्व्हायकल कॅन्सरमुळे तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पूनम पांडे कॅन्सरशी दोन हात करून आयुष्याचा लढा जिंकू शकली नाही. पण काही उदाहरणे अशीही आहेत जेथे सेलिब्रिटींनी कॅन्सरसारख्या आजारावर मात केली आहे. जाणून घेऊया असा सेलिब्रिटींबद्दल.

Manisha Koirala: बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला २०१२ मध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होती. तिने अमेरिकेत उपचार घेतले आणि २०१५ मध्ये ती कॅन्सरमुक्त असल्याचे जाहीर केले. 'हील्ड: हाऊ कॅन्सर गव्ह मी अ न्यू लाइफ' या पुस्तकात तिने आपले अनुभव शेअर केले आहेत.

Yuvraj Singh: क्रिकेटपटू युवराज सिंगला २०११ मध्ये मेडियास्टिनल सेमिनोमा या दुर्मिळ प्रकारचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्याच्यावर अमेरिकेत उपचार झाले आणि २०१२ मध्ये तो क्रिकेटच्या मैदानात परतला. कर्करोग ग्रस्तांसाठी त्याने आता 'युवी कॅन्सर फाउंडेशन'ची स्थापना केली आहे.

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला २०१८ मध्ये मेटास्टॅटिक कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले आणि २०१९ मध्ये घोषित केले की ती कर्करोगापासून मुक्त आहे. कर्करोग जनजागृतीसाठी ती उघडपणे बोलतानाही बरेचदा दिसते.

Sanjay Dutt: संजय दत्तला २०२०मध्ये फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर बॉलीवूडचा खलनायक आपत्कालीन वैद्यकीय मदत घेऊन यावर मात करत प्राणघातक आजारातून बाहेर पडला. त्यानंतर आता तो ठणठणीत असू पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

Anurag Basu: २००४ मध्ये गँगस्टर चित्रपटाचे शूटिंग करत असताना, प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माते अनुराग बसू यांना तीव्र प्रोमायलोसाइटिक ल्युकेमिया (रक्त कर्करोगाचा एक प्रकार) असल्याचे निदान झाले. त्यावर योग्य ते उपचार वेळेत घेतल्याने त्याने या आजारावर मात केली आणि आता तोदेखील उत्तम आयुष्य जगत आहे.