माय डार्लिंग पारु! लग्नानंतरच्या पहिल्या करवा चौथच्या दिवशी राघवने परिणीतीसोबतचे खास फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:17 IST2024-10-21T14:57:39+5:302024-10-21T15:17:19+5:30
लग्नानंतरच्या पहिल्या करवा चौथच्या दिवशी राघवची पत्नी परिणीतीसाठी खास पोस्ट (parineeti chopra, raghav chadha)

परिणीती चोप्राने लग्नानंतरची पहिली करवा चौथ साजरी केलीय. यावेळी तिचे कुटुंबिय आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते
परिणीती चोप्राच्या कुटुंबाने यावेळी एकमेकांना मिठाई देत खास ताट सजवत करवा चौथची जय्यत केलेली दिसली
यावेळी राघव चढ्ढासाठी परिणीती चोप्राने खास व्रत ठेवलं होतं. परिणीती आणि राघवचं लग्नानंतरच हे पहिलं करवा चौथ होतं
माय डार्लिंग पारू, असं म्हणत राघव चढ्ढाने परिणीती चोप्राचं कौतुक केलंय. दिवसभर काहीही न खाता परिणीतीने प्रेमाने हे व्रत केल्याने राघवने तिचे आभार मानले
परिणीतीने करवा चौथसाठी राघवसाठी खास मेहंदी काढली होती. परिणीतीने काढलेली मेहंदी बघून राघव चांगलाच थक्क झालेला दिसला
परिणीतीने यावेळी स्वतःचा खास सेल्फी घेतला. परिणीती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय
परिणीती आणि राघव चढ्ढांच्या करवा चौथच्या या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. परिणीती-राघवने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ आनंदाने साजरा केला