नेहा कक्करला या कारणामुळे सोशल मीडियावर करण्यात आले ट्रोल, ट्रोलर्सने सुनावले या शब्दांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 14:40 IST2020-04-21T14:38:00+5:302020-04-21T14:40:02+5:30

नेहा कक्कर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नेहाने या व्हिडिओत उशी एखाद्या ड्रेसप्रमाणे परिधान केली आहे.
नेहा या तिच्या अवतारात 'मास्को माशूका' या तिच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
नेहाने या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे की, 'मास्को माशूका या गाण्यावर पिलो चैलेंज...'
नेहाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडेल असे तिला वाटले होते. पण तिला या व्हिडिओमुळे चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
नेहाला या व्हिडिओवर अतिशय विचित्र कमेंट मिळत आहेत. लॉकडाऊनमध्ये तू गरीब झालीस का... गरिबीमुळे तुझ्यावर उशी परिधान करण्याची वेळ आली का असे एका नेटिझनने तिला सुनावले आहे.
नेहाला या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले असले तरी काही जणांना तिचा हा अंदाज भावत असल्याचे देखील तिला कमेंटद्वारे सांगत आहेत.