'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या लूकमधील प्रार्थनाने शेअर केले फोटो, यशच नाही तर चाहतेही झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 20:57 IST2022-07-13T20:50:06+5:302022-07-13T20:57:39+5:30
Mazi Tuzi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे.
या मालिकेत नेहा आणि यशची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे.
यशची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदेने साकारली आहे तर नेहाची भूमिका प्रार्थना बेहरेने.
प्रार्थना बेहरेच्या नेहाच्या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
मालिकेत नेहा आणि यशचे नुकतेच लग्न झाले. त्यामुळे लग्नानंतर नेहाचा लूक बदलेला पाहायला मिळतो आहे.
नुकतेच प्रार्थना बेहरेने नेहाच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यात ती साडीत पाहायला मिळत आहे.
प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
यशच काय चाहतेही नेहाच्या साडीतील लूकवर घायाळ झाले आहेत.