मायराच्या आई-बाबांनी दिली गोड बातमी, घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, मुलगा की मुलगी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 16:27 IST2024-09-15T16:21:15+5:302024-09-15T16:27:10+5:30
मायराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ नेहमी चर्चेत असते.
मायराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण, मायरा आता एका चिमुकल्याची चाहती झाली आहे. बालकलाकार मायरा वैकुळ आता मोठी ताई झाली आहे.
मायराची आई श्वेताने बाळाला जन्म दिला आहे. मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे.
मायराचे आई-बाबा श्वेता व गौरव वायकुळ यांना मुलगा झाला आहे. मायरला आता एक भाऊ मिळाला आहे.
इन्स्टाग्राम शेअर केलेल्या फोटोंमध्ये मायरा ही तिच्या आई वडिलांसोबत दिसते आहे.
मायरा मोठी ताई झाल्याने तिचे चाहते खूप खूश झाले आहेत. या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी मायराने आई-वडिलांबरोबर खास फोटोशूट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.