Netflix वर 'हा' सिनेमा करतोय नंबर १ वर ट्रेंड; 'धुरंधर'ला टाकलं मागे, तुम्ही पाहिलाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:07 IST2026-03-30T15:55:16+5:302026-03-30T16:07:59+5:30

सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगली चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी 'धुरंधर' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. परंतु अनेक दिवस नंबर १ वर असलेला 'धुरंधर' पिछाडीवर गेला. कारण एका बॉलिवूड सिनेमाने 'धुरंधर'ला मागे टाकलं आहे.

सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगली चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी 'धुरंधर' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. परंतु अनेक दिवस नंबर १ वर असलेला 'धुरंधर' पिछाडीवर गेला. कारण एका बॉलिवूड सिनेमाने 'धुरंधर'ला मागे टाकलं आहे.

हा सिनेमा म्हणजे 'मर्दानी ३'. राणी मुखर्जीची दमदार भूमिका असलेला 'मर्दानी ३' नेटफ्लिक्सवर येताच नंबर १ वर ट्रेंड झाला आहे. थिएटरमध्ये इतका न चाललेला 'मर्दानी ३' ओटीटीवर मात्र तुफान चालतोय.

'मर्दानी ३' मध्ये राणी मुखर्जीने पुन्हा एकदा 'शिवानी शिवाजी रॉय' या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या भागातील तिचा अभिनय आणि चित्रपटाची थरारक कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात 'मर्दानी ३' या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या 'टॉप १०' यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर'ने काही काळापासून हे स्थान टिकवून ठेवले होते, मात्र आता राणीच्या चित्रपटाने त्यावर कब्जा केला आहे.

'मर्दानी ३' चित्रपटात दाखवलेला वास्तववादी कहाणी आणि गुन्हेगारी विश्वाचा पर्दाफाश करण्याची पद्धत प्रेक्षकांना खूप आवडली आहे. सोशल मीडियावर "राणी मुखर्जी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली आहे," अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा देखील एक मोठा अ‍ॅक्शन चित्रपट आहे आणि तो ओटीटीवर बराच काळ गाजला. मात्र राणीचा 'मर्दानी ३' प्रेक्षकांना आवडल्याने 'धुरंधर' आता काहीसा मागे पडला आहे.

'मर्दानी ३' च्या या प्रचंड यशानंतर आता यशराज फिल्म्स या फ्रँचायझीचा चौथा भाग आणणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राणी मुखर्जीने या यशाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले असून ती लवकरच काही नवीन आणि आव्हानात्मक भूमिकांमध्ये दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत.