"क्या खूब लगती हो...", 'गोठ' फेम अभिनेत्री रुपल नंदचा रेट्रो लूक; फोटोंची रंगलीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:08 IST2024-12-07T17:01:55+5:302024-12-07T17:08:02+5:30

अभिनेत्री रुपल नंद हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

'गोठ' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

या मालिकेत तिने राधा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

त्याशिवाय रुपलने 'मुंबई-पुणे-मुंबई २' आणि 'अँड जरा हटके' मध्येही काम केलं आहे.

रुपल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यावर अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर रेट्रो लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

दोण वेण्या तसेच भागलपुरी प्रिंटेड साडी नेसून तिने फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्रीने या फोटोंमध्ये हटके पोज देत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.