What..! नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई, अखेर सीक्रेट आले जगासमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:15 PM2023-03-17T13:15:44+5:302023-03-17T13:22:16+5:30

Nehha Pendse : नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे.

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली.

नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे.

'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये नेहाने ही गोष्ट कबूलही केली आहे.

नेहाची ही सहा मुलं कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र ही मुलं म्हणजे नेहाने दत्तक घेतलेले कुत्रे आहेत. यामागची कहाणी ती या टॉक शोमध्ये सांगितली आहे.

नेहा पेंडसे म्हणाली की, ही सहा गोंडस बाळं म्हणजेच कुत्री. मी आणि माझा नवरा दोघेही प्राणी प्रेमी आहोत. त्याच्याकडे आधी ४ कुत्रे होते. लग्नानंतर माझे दोन कुत्रे असे एकूण सहा कुत्रे आहेत.

ती पुढे म्हणाली की, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मी घरी असताना माझ्या आजूबाजूला कोणीच येऊ शकत नाही. त्यांच्यामुळे मी घरी खूपच सुरक्षित असते. त्यांच्या परवानगी शिवाय कोणीच माझ्या जवळ येऊ शकत नाही.

नेहाने जानेवारी २०२० मध्ये बिझनेसमन शार्दुल बयासशी लग्न केले. ती बिग बॉस १२ मध्येही झळकली होती.

नेहाने ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तर ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स रिॲलिटी शोच्या अंतिम फेरीतही तिने मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती.

फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी या सिनेमातही ती झळकली होती.