'ती सध्या काय करते?' चित्रपटातील 'ही' बालकलाकार आठवते? अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते चिंतेत, नेमकं झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:21 IST2026-02-18T18:14:37+5:302026-02-18T18:21:50+5:30

तेजश्री प्रधानच्या बालपणीची भूमिका साकारुन चमकली! 'ती सध्या काय करते' चित्रपटातील अभिनेत्रीला पाहून चाहते काळजीत

सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, उर्मिला कोठारे तसेच अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर, सुकन्या मोने यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

या चित्रपटात तन्वीची म्हणजेच तेजश्री प्रधानची बालपणीची भूमिका बालकलाकार निर्मोही अग्निहोत्रीने साकारली होती. तर किशोरवयीन तन्वीची भूमिका आर्या आंबेकरने साकारली होती.

निर्मोहीने यात केलेल्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं.निर्मोही ही नाट्य कलावंत सारिका अग्निहोत्री यांची कन्या आहे.

निर्मोही अग्निहोत्रीला नृत्याचीही तितकीच आवड आहे. या चित्रपटानंतर 'खुलता कळी खुलेना' मालिकेत दिसली. मात्र, त्यानंतर ती इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.

अशातच सोशल मीडियावर निर्मोही काही फोटो समोर आलेत. हे फोटो पाहून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

निर्मोही सोशल मीडियावर ती तिच्या कथ्थक नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असते. पण,त्यात निर्मोहीचे सोशल मीडियावरचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांना काळजीत टाकणारे आहेत.

निर्मोहीच्या डोक्यावरचे कापलेले केस बघून चाहत्यांनी तिला प्रश्न केले आहेत. अर्थात तिच्या तब्येतीबाबत काळजी करण्याचे कुठलेही कारण नसावे, अशीच प्रार्थना तिचे चाहते करत आहेत.