मराठी नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत रंगला ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 02:12 PM2024-04-01T14:12:58+5:302024-04-01T14:21:10+5:30

Zee Natya Gaurav 2024 : मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२४ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात.

मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२४ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात.

तसेच या सोहोळ्यात 'अतुल परचुरे' खूप काळानंतर 'व्यक्ती आणि वल्ली'च्या रूपात रंगभूमीवर येणार आहेत आणि त्यांच्या सॊबत असणार आहेत 'महेश मांजरेकर', 'आनंद इंगळे' आणि 'सुनील बर्वे'.

तसेच 'सिद्धार्थ जाधव' 'शाहरुख मांजरसुभेकर' मधील प्रवेश साकारून 'महेश मांजरेकरांना' मानवंदना देणार आहे.

झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर झी मराठी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यातला अभिनेता अतुल परचुरे यांचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेते अतुल परचुरे यांचा एक खास परफॉर्मन्स देताना पाहायला मिळत आहे. सोहळ्यात बोलताना ते म्हणाले, 'साधारण वर्षभरापूर्वी मी उभा राहू शकेन की नाही, याची मलाही गॅरेंटी नव्हती. मी आज आहे इथे तो केवळ तुमच्यामुळेच'.

तसेच प्रेक्षकांना 'जर तर ची गोष्ट', 'करून गेलो गाव' आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश पाहता येणार आहेत.

तसेच अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरव च्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहेत.

तेव्हा नटसम्राट येणार, हाऊसफुल्लचा बोर्ड लागणार प्रयोग पाहायला यावंच लागणार आहे.

झी मराठी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा येत्या ७ एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. नाट्यरसिकांना या सोहळ्याची दरवर्षी प्रतीक्षा असते.

या सोहळ्यामध्ये नाट्यविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.