स्पृहा जोशीची बहीण या क्षेत्रात कमावते नाव,कामगिरी वाचून वाटेल कौतुकास्पद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 09:00 AM2021-12-10T09:00:00+5:302021-12-10T09:00:00+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून Spruha Joshiची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मोरया, पैसा पैसा यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

विविध नाटकांतून तिने काम केले. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने जादू दाखवली आहे.

स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते.

स्पृहाप्रमाणेच तिची बहिणसुद्धा तितकीच टॅलेंटेड आहे. क्षिप्रा जोशी असे तिचे नाव आहे.

क्षिप्रा ही स्पृहाची लहान बहीण आहे.क्षिप्राने स्पृहाप्रमाणे अभिनय क्षेत्राची निवड न करता करिअरसाठी वेगळ्याच क्षेत्राची निवड केली.

भारतीय जिम्नॅस्टिक प्लेअर म्हणून क्षिप्राने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.वाचून तुम्हालाही नक्कीच अभिमानास्पद वाटले असणार.

क्षिप्रा स्पृहाप्रमाणेच दिसायला सुंदर आहे.तिने अनेक आतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत.

क्षिप्राने म्युजिक कंपोजर आणि साउंड डिझायनर असलेल्या कल्पेश मोरेसोबत लग्न केले आहे.

सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पाहायला मिळतील.