सोनाली कुलकर्णीचा कातिलाना अंदाज, गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:26 IST2021-11-22T15:22:01+5:302021-11-22T15:26:38+5:30

सोनाली कुलकर्णीने पुन्हा एकदा आपला नवा अंदाज फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे. ती नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

प्रत्येक वेळी ती तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन येत असते.

तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत.

यामध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

सोनालीचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

या आधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे सोनालीचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.