हातात जास्वंदाचे फुल अन् चेहऱ्यावर गोड हसू; गौतमीच्या फोटोंची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 17:03 IST2024-07-22T16:51:16+5:302024-07-22T17:03:02+5:30
सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही एक उत्तम नृत्यांगणा आहे.

आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर गौतमी आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
सध्या तरुण वर्गामध्ये गौतमी पाटील या नावाची मोठी क्रेझ पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात.
'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'दिलाचं पाखरु', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' तसेच 'पाटलांचा बैलगाडा' यांसारख्या गाण्यांवर डान्स करत तिने चाहत्यांची मनं जिंकली.
सोशल मीडियावर गौतमी नेहमीच सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सोशल मीडियावर गौतमीची तगडी फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते.
नुकतेच तिने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो पोस्ट केलेत.
हातात जास्वंदाचे फुल घेत तिने हे फोटो क्लिक केलेत. तसेच या व्हायरल फोटोंमध्ये गौतमीचं सौंदर्य खुलून आलंय.