स्मिता गोंदकरचं बोल्ड बिकिनी फोटोशूट चर्चेत, हॉटेल कर्मचाऱ्यालाच सांगितला फोटो काढायला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 07:01 PM2023-01-07T19:01:04+5:302023-01-07T19:05:45+5:30

Smita Gondkar : अभिनेत्री स्मिता गोंदकरचा बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर बऱ्याचदा बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये आणखी वाढ झाली.

आता स्मिता गोंदकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

स्मिता तिच्या व्यस्त कामातून वेळ काढत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली.

ती व्हॅकेशनसाठी नेमकी कुठे गेली होती? हे तिने सांगितले नाही.

पण यादरम्यान ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तेथील फोटो स्मिताने शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

स्मिताने या फोटोत काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तसेच स्वमिंग पूलमध्ये बसलेला तिचा हा फोटो आहे. पण या फोटोमागे एक वेगळीच गंमत आहे.

ती म्हणजे ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथल्याच हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिचा हा फोटो काढला आहे. स्मिताने फोटो शेअर करत स्वतःच याबाबत सांगितले आहे. स्मिता म्हणाली, जेव्हा हॉटेल कर्मचारी परफेक्ट फोटो काढतात.

स्मिताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी स्मिताला ट्रोल केलं आहे तर काहींनी तिच्या या हॉट लूकची प्रशंसा केलीय.