सिद्धार्थ आणि मितालीनं अुभवली नयनरम्य 'नॉर्दन लाइट्स', पाहा अद्भुत PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:13 IST2025-03-21T14:03:21+5:302025-03-21T14:13:44+5:30

अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) ही जोडी कायमच चर्चेत असते. दोघांनीही विविध देश फिरायला आवडतात. त्यांच्या भटकंतीचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.

अशातच आता सिद्धार्थ आणि मिताली थेट उत्तर युरोपातील व स्कॅंडिनेव्हियातील देश फिनलंडमध्ये पोहचलेत. या जोडीनं फिनलंडमध्ये नॉर्दन लाइट्सचा (Northern Lights Aurora In Finland) हा निसर्गाचा अद्भुत नयनरम्य नजारा पाहिलाय.

याचे काही फोटो त्यांनी आपल्या इन्स्टग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये निसर्गाचं रहस्यमय सौंदर्य पाहायला मिळतंय.

'नॉर्दन लाइट्स' पाहिल्याचाआनंद मितालीच्या चेहऱ्यावर झळकतोय.

'नॉर्दन लाइट्स' ही नैसर्गिक रोषणाई पाहण्यासाठी दरवर्षी हजारो-लाखो पर्यटक स्कॅन्डिनेव्हिया येथील फिनलंड या देशाला भेट देतात.

'नॉर्दन लाइट्स'ला अरोरा बोरेलिस असेही म्हणतात. हा दुर्मिळ क्षण प्रत्यक्ष अनुभवणे ही फारच मोठी बाब आहे.

मिताली आणि सिद्धार्थचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून व्हायरल झाले आहेत.

'नॉर्दन लाइट्स'च शास्त्रीय मूळ आहे सूर्य. सुर्याचे लहान मोठे कण अंतरिक्षात फेकले जातात. सूर्यापासून उद्भवणाऱ्या या कणांना पृथ्वीवर पोहोचण्यासाठी चार दिवस लागतात.

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात आल्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हे कण दोन भागात विभागून उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे फेकले जातात. उत्तर ध्रुवावर हे कण पृथ्वीवर असलेल्या वायूंसोबत मिसळल्याने ते आपल्याला रंगीत लाइट्सच्या स्वरूपात दिसतात.

'नॉर्दन लाइट्स'चा हा निसर्गरम्य रंगांचा नजारा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी पाहिला पाहिजे.