'हिला उर्फी जावेद चावली का...?', सई ताम्हणकर कपड्यांमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 11:32 AM2022-11-17T11:32:25+5:302022-11-17T11:37:45+5:30

Saie Tamhankar : सई ताम्हणकर हटके आउटफिटमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. कुणी तिची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहे तर कुणी तिला गरीबांची सनी लिओनी म्हणत आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सई ताम्हणकर हिने नुकतीच एका अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली. त्यासाठी तिने निवडलेल्या आउटफिटमुळे ती चर्चेत आली आहे.

सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर या आउटफिटमधील फोटोशूट शेअर केले आहे. सईने नेहमीपेक्षा हटके ड्रेस परिधान केला आहे.

सई ताम्हणकरच्या या फोटोंना काही चाहत्यांची पसंती मिळत आहे. तर काहींनी सई ताम्हणकरचा हा ड्रेस पाहून तिला ट्रोल केले आहे.

एका युजरने म्हटले की, गरीबांची सनी लिओनी, तर दुसऱ्या युजरने म्हटले की, सईला उर्फी जावेदसारखं वेड लागलं वाटतं. तर आणखी एकानं लिहिले की, हिला उर्फी जावेद चावली का?

तर आणखी एका युजरने सईच्या फोटोवर कमेंट केली की, या अवॉर्डला पूर्ण कपडे घालून गेलेलं चालत नाही का??

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच मधुर भांडारकर दिग्दर्शित इंडिया लॉकडाउनमध्ये झळकणार आहे. या सिनेमात ती फुलमतीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.