'सेक्रेड गेम्स'मधील काटेकर उर्फ अभिनेता जितेंद्र जोशीची पत्नीदेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 07:00 IST2020-06-10T07:00:00+5:302020-06-10T07:00:00+5:30
फार कमी लोकांना माहित आहे की जितेंद्र जोशीची पत्नीदेखील सिनेइंडस्ट्रीत आहे कार्यरत

चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.
दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो.
जितेंद्र अभिनयासह सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो.
अभिनेता जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असून ती गृहिणी आहे.
मिताली चित्रपट व नाटकांचे लेखन करते. तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे.
मिताली व जितेंद्र यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
मिताली आणि जितेंद्र यांना एक मुलगी आहे जिचे नाव रेवा आहे.