केतकी माटेगावकरनं शेअर केले सुंदर फोटो, चाहते म्हणतात एखाद्याने किती सुंदर असावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:13 IST2025-01-16T17:04:09+5:302025-01-16T17:13:06+5:30

सुमधुर आवाज तसेच सौंदर्याचीही धनी आहे केतकी माटेगावकर

संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचे वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.

केतकी माटेगावकर हे नाव ऐकलं की आपोआपच आपल्या कानात सुरेल स्वर ऐकू यायला लागतात.

पण एवढेच नाही, तर तिचा सुंदर चेहराही डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. केतकीचा आवाज जसा गोड तसेच ती दिसतेही सुंदर.

सहजसुंदर असेलली केतकी जेव्हा मॉर्डन रुपात चाहत्यांसमोर येते, तेव्हाही तिला चाहत्यांचं तेवढेच प्रेम मिळतं.

आताही तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. केतकीनं सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

"आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...", असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

ब्लॅक आऊटफीटमधील तिचा हा लूक चाहत्यांनाही आवडला आहे.

या फोटोंमध्ये केतकी कहर करताना दिसत आहे. तीच नजर चाहत्यांच्या काळजात धस्स करतेय.

तिचा हा लूक खूपच हॉट आणि गॉर्जियस आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.