रोहिणी हट्टंगडींचा मुलगाही आहे लोकप्रिय अभिनेता; अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
By देवेंद्र जाधव | Updated: September 23, 2025 13:57 IST2025-09-23T13:43:52+5:302025-09-23T13:57:49+5:30
रोहिणी हट्टंगडींचा लेक बॉलिवूड गाजवतोय. काजोल, विकी कौशल यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत त्यांच्या मुलाने काम केलंय. तुम्हाला माहितीये?

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी. रोहिणी हट्टंगडींचा मुलगाही अभिनेता आहे हे फार कमी जणांना माहित असेल
रोहिणी हट्टंगडींच्या मुलाचं नाव आहे असीम हट्टंगडी. बॉलिवूडमधील विविध सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये असीम यांनी काम केलंय.
असीम यांचे वडील जयदेव हट्टंगडी हे ख्यातनाम दिग्दर्शक होते. आई- वडिलांचा समृद्ध वारसा असीम पुढे चालवत आहे.
असीम हट्टंगडी यांनी हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कॉपी' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
असीम यांनी पुढे 'अग्ली', 'माय फ्रेंड पिंटो', 'गोविंदा नाम मेरा', 'रश्मी रॉकेट', 'बॅरोट हाऊस' या गाजलेल्या सिनेमांमध्ये विविध कलाकारांसोबत काम केलंय.
याशिवाय 'स्कूप' आणि नुकत्याच रिलीज झालेल्या काजोलच्या 'द ट्रायल' सिनेमात असीम यांनी काम केलंय. असीम रंगूमीवरही चांगलेच सक्रीय असून हिंदी नाटकात काम करतात
सोशल मीडियावर असीम हे आई रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत विविध फोटो शेअर करताना दिसतात. असीम आई-बाबांची शिकवण मनात ठेऊन त्यांची फिल्मी कारकीर्द वाढवत आहेत