अशी झाली होती रिंकूची सैराट सिनेमाची निवड, सातवीत असताना दिले होते ऑडिशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 20:05 IST2020-06-06T19:20:55+5:302020-06-06T20:05:28+5:30
सैराट नंतर रिंकू राजगुरु हे नाव एका रात्रीत घराघरात पोहोचले होते.

रिंकू राजगुरुने सातवी इयत्तेत शिकत असताना तिने सैराट सिनेमासाठी ऑडिशन दिले. (PHOTO INSTAGRAM)
पण, वर्षभरानंतर तिची या सिनेमासाठी निवड झाली. (PHOTO INSTAGRAM)
नववी इयत्तेत गेल्यानंतर तिने या सिनेमाचं शूटिंग सुरू केले. (PHOTO INSTAGRAM)
त्यामुळे ती वर्षभर शाळेत गेली नाही. (PHOTO INSTAGRAM)
मात्र सैराट सिनेमानंतर तिच्या आयुष्याला नवी भरारी मिळाली.(PHOTO INSTAGRAM)
रिंकूला डान्स करायला खूप आवडतो, सैराटच्या ऑडिशनवेळीदेखील तिला डान्स सादर करायला सांगितला होता. (PHOTO INSTAGRAM)
रिंकू अष्टपैलू अभिनेत्री आहे, इतक्या लहान वयात ती यशाच्या शिखरावर आहे. (PHOTO INSTAGRAM)
सैराटनंतर रिंकू कागर, मेकअप या सिनेमात झळकली. (PHOTO INSTAGRAM)
तिने हंड्रेड या वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले. (PHOTO INSTAGRAM)