मेकअपशिवाय सुद्धा सुंदर दिसते रिंकू; पाहा आर्चीचे नो मेकअप लूकमधील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 16:17 IST2024-02-06T16:13:09+5:302024-02-06T16:17:47+5:30

Rinku rajguru: रिंकू कायम तिच्या साधेपणामुळे चर्चेत येत असते.

सैराट सिनेमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आज रिंकूकडे पाहिलं जातं. अलिकडेच ती 'झिम्मा 2' या सिनेमात झळकली होती.

रिंकूने मराठीसह हिंदी वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर साऊथ सिनेमामध्येही ती झळकली आहे.

रिंकूचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी रिंकू तिच्या हटके फोटोशूट आणि लूकमुळेही चर्चेत येत असते.

रिंकूने अलिकडेच एक फोटोशूट केलं असून त्यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

रिंकूने डार्क ब्ल्यू कलरच्या कम्फर्टेबल कपड्यांमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत.