"लग्न कधी करणार?", रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचे फोटो पाहून नेटकरी सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 01:40 PM2024-01-15T13:40:49+5:302024-01-15T14:10:03+5:30

रिंकू आणि आकाशला पुन्हा एकत्र पाहून चाहते खूश झाले. पण, त्यांच्या या फोटोंमुळे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत.

'सैराट'मधून आर्ची-परश्याची भूमिका साकारून ते प्रसिद्धीझोतात आले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराटची क्रेझ आजही कायम आहे.

८ वर्षांनंतरही प्रेक्षक रिंकू आणि आकाशची लोकप्रियता कमी झालेली नाही. 'सैराट'नंतर त्यांना पुन्हा एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सुक होते.

'सैराट'नंतर रिंकू आणि आकाश 'झुंड'मध्ये झळकले होते. पण, त्यांनी या सिनेमात एकत्र काम केलं नव्हतं.

नुकतंच रिंकू आणि आकाशने आमिर खानची लेक आयरा खानच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती. पापाराझींना त्यांनी फोटोसाठी एकत्र पोझही दिल्या होत्या.

ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता रिंकूने आकाशबरोबरचे काही फोटोही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रिंकू आणि आकाशला पुन्हा एकत्र पाहून चाहते खूश झाले.

पण, त्यांच्या या फोटोंमुळे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे. त्यांच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

एकाने कमेंट करत "तारीख काय ठरली मग लग्नाची? कधी येऊ मी?" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "सैराट २ शूटिंग चालू झालं",अशी कमेंट केली आहे.

"साधं लग्न करू नका...पळून लव्ह मॅरेज करा", असंही एकाने म्हटलं आहे. "तुम्ही दोघे लग्न करा जसं की रितेश देशमुख जिनिलीया देशमुख", अशी कमेंटही केली आहे.

"नं. १ जोडी...लग्न करून टाका", अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने "तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता", असंही म्हटलं आहे.

रिंकु आणि आकाशचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.