प्राजक्ता माळीच्या सौंदर्याचं सिक्रेट आलं समोर, उपाशीपोटी पिते 'हा' सुपरहेल्दी ज्यूस, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:39 IST2025-11-11T14:27:44+5:302025-11-11T14:39:02+5:30

आज आम्ही तुम्हाला फिटनेस क्वीन प्राजक्ता माळीच्या चमकदार त्वचेचे सीक्रेट सांगणार आहोत.

प्राजक्ता माळी ही महाराष्ट्रातील तरूणांच्या गळ्यातील ताईतच आहे. तिची अदाकारी, तिचं सौंदर्य, तिचं हासू हे सारंच लोकांना खूप भावतं. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

प्राजक्ता वयाच्या ३६ मध्ये येऊनही इतकी फिट, एनर्जेटिक कशी राहते, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना कायम पडत असतो. तर यामागचे सीक्रेट तिच्या एका ज्यूसमध्ये आहे.

प्राजक्ता माळी उठताच सर्वात आधी रिकाम्या पोटी एक खास ज्यूस पिते. याबद्दल खुद्द तिनेच सांगितलंय.

नुकतंच प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक खास 'सुपरहेल्दी' ज्यूसची रेसिपी शेअर केली आहे, जो ती सकाळी उपाशीपोटी पिते.

दोन आवळे, १ काकडी, ७-८ पुदिनाच्या पाने, अर्ध लिंबू याचा वापर करून प्राजक्ताने सकाळी उपाशीपोटी पिण्यासाठी सुपरहेल्दी ज्यूस बनवला.

प्राजक्ता ज्युसची रेसिपी सांगत कॅप्शनमध्ये म्हणते, "दिवसातील पहिला ज्यूस, जो मी उपाशीपोटी प्यायले… #GoGreen".

हा ज्यूस केवळ शरीराला डिटॉक्स (Detox) करत नाही, तर दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो.

प्राजक्ताचा हा ज्यूस तिच्या आरोग्य आणि सुंदर फिगरचे एक सिक्रेट आहे. आवळा 'व्हिटॅमिन सी'चा उत्तम स्रोत असून तो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, तर काकडी शरीराला हायड्रेटेड ठेवते. पुदिना पचनक्रिया सुधारतो, तर लिंबू डिटॉक्समध्ये मदत करते. उपाशीपोटी हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि मेटाबॉलिज्म सुधारतं.

जर तुम्हालाही अभिनेत्रीसारखी ग्लोइंग स्कीन हवी असेल तर तुम्ही हे वापरून पाहू शकता.

प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनेत्री असण्यासोबतचं निर्माती आणि बिजनेस वुमनही आहे. तिने 'फुलवंती' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर तिचा दागिन्यांचा ब्रँडही आहे. याशिवास कर्जतमध्ये प्राजक्ताचं मोठं फार्महाऊसही आहे.