PHOTOS : प्रिया बापटची बहिण तिच्या इतकीच दिसते खूप सुंदर, तिचादेखील आहे कलाविश्वाशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 02:30 PM2023-11-14T14:30:08+5:302023-11-14T14:33:18+5:30

Priya Bapat's Sister : अभिनेत्री प्रिया बापटच्या बहिणीचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेत्रीनं खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बापट हिने वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

प्रिया बापट इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिची स्टाईल स्टेटमेंट सर्वांनाच खूप भावते. तिच्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये तिच्या बहिणीचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की, प्रिया बापटला सख्खी बहिण आहे जिचे नाव श्वेता आहे. तिचा देखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. आज श्वेताचा वाढदिवस असून यानिमित्ताने प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रिया बापटने श्वेता बापटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्वेता बापट. लहानपणी एकमेकांचे डोके भिंतीवर आदळण्यापासून ते सतत एकमेकांच्या पाठीशी असण्यापर्यंत, आम्ही आहोत आणि नेहमीच एकत्र राहू! आपण खरोखर पात्र आहात अशा प्रेम आणि असीम यशाची शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रियाचे चाहते तिच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. श्वेता बापट ही सेलिब्रेटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर आहे. प्रियाचीदेखील तिच स्टायलिस्ट आहे. प्रिया बापट शिवाय ती बऱ्याच सेलिब्रेटींसाठी स्टायलिस्ट म्हणून काम करते.

या व्यतिरिक्त प्रिया बापट आणि श्वेताचा सावेंची हा साडी ब्रॅण्ड आहे. त्यांचे सोशल मीडियावर अधिकृत पेजदेखील आहे. या अकाउंटवर साड्यांचे कलेक्शन पहायला मिळतात.

प्रिया आणि श्वेता या दोघींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे.