कुठे गेली 'पछाडलेला'मधली श्रेयसची गर्लफ्रेंड? सिनेमानंतर झालेली गायब, आता काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:15 IST2025-07-19T12:41:29+5:302025-07-19T13:15:10+5:30
आता खूपच ग्लॅमरस दिसते दुर्गा मावशीची लेक, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

'पछाडलेला' या मराठीतील गाजलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं. झपाटलेलानंतर मराठीतील हॉरर सिनेमांमध्ये 'पछाडलेला'चं नाव घेतलं जातं.
या सिनेमात श्रेयस तळपदे, भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, अभिराम भडमकर, वंदना गुप्ते, मेघा घाटगे, नीलम शिर्के, अश्विनी कुलकर्णी अशी स्टारकास्ट होती.
सिनेमात श्रेयसची गर्लफ्रेंड आणि दुर्गा मावशीची लेक मनिषा ही भूमिका अश्विनी कुलकर्णीने साकारली होती.
"सूड दुर्गे सूड" म्हणणाऱ्या दुर्गा मावशीची लेक आता कशी दिसते? काय करते हे तुम्हाला माहितीये का?
'पछाडलेला' सिनेमानंतर अश्विनी फारशी कुठे दिसली नाही. पण, 'नाय वरण भात लोणचं, कोण नाय कोणचं' या सिनेमामुळे ती पुन्हा चर्चेत आली होती.
अश्विनीने 'गोविंदा', 'विठ्ठल माझा सोबती', 'घे डबल', 'व्हॉट्स अप लग्न', 'फुलराणी', 'बापू वीरू वाटेगावकर', '८ दोन ७५' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
'सौभाग्यवती सरपंच' या वेबसीरिजमध्येही ती दिसली होती.
पहिल्यापेक्षा आता अश्विनी फारच ग्लॅमरस दिसते. अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करत असते.