निर्मिती सावंत यांच्या सूनेला पाहिलंत का? दिसायला सुंदर; अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:33 IST2026-01-20T15:24:52+5:302026-01-20T15:33:23+5:30
निर्मिती सावंत यांची सून काय करते?

अभिनेत्री निर्मिती सावंत हे नाव मराठी इंडस्ट्रीत सर्वात अग्रस्थानी आहे. परफेक्ट कॉमेडी टायमिंग, उत्कृष्ट अभिनय यामुळे त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

आपण त्यांना टीव्ही, सिनेमा आणि नाटकांमध्ये पाहिलं आहेच. त्यांचा स्क्रीनवरील वावर हा भल्याभल्यांना टक्कर देतो.

निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय हा देखील कलाकार आहे. त्याने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच सिनेमांमध्येही तो दिसतो.

दरम्यान अभिनयची बायको आणि निर्मिती सावंत यांची सूनही खूप हुशार आहे. पूर्वा पंडित असं तिचं नाव आहे. २०१७ सालीच अभिनय आणि पूर्वाने लग्नगाठ बांधली.

पूर्वा दिसायला अतिशय सुंदर आहे. ती उत्तम आर्टिस्ट आहे. जे जे स्कुल ऑफ आर्ट्समध्ये तिने शिक्षण घेतलं आहे. अभिनय आणि तिची लग्नाआधीपासून १२ वर्षांची मैत्री होती.

पूर्वा पंडित ही डुडल आर्टिस्ट आहे. तिची स्वत:ची डुडल कंपनी आहे. सोशल मीडियावर तिच्या डुडल आर्ट्सची झलक दिसते. तसंच ती होम डेकोररही आहे.

पूर्वा आणि निर्मिती सावंत सासू सून कमी आणि माय लेकीच जास्त वाटतात. लग्नाआधीही ती बऱ्याच वर्षांपासून घरी येत असल्याने तिची सासूसोबत तेव्हापासूनच गट्टी जमली होती.

निर्मिती सावंतच्या प्रत्येक सिनेमाच्या इव्हेंटला लेक अभिनय आणि सून पूर्वा हजेरी लावतात. तसंच निर्मिती सावंतही सूनेच्या करिअरला कायम प्रोत्साहन देतात.

















