आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमध्ये दिसली नेहा पेंडसे, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:13 IST2025-09-09T14:08:28+5:302025-09-09T14:13:06+5:30
Neha Pendse : नेहा पेंडसे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. मात्र आता तिने आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमधील फोटो शेअर केलेत.

नेहा पेंडसे सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे.
नेहा पेंडसे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. मात्र आता तिने आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमधील फोटो शेअर केलेत.
या फोटोशूटमध्ये नेहा पेंडसेने ऑफ शोल्डर व्हाइट रंगाचा वन पीस घातला आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत आणि कानात गोल्डन रिंगचे इअररिंग्स घातले आहेत.
नेहा पेंडसे या फोटोत खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.
नेहा पेंडसेने वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने १९९५ मध्ये एकता कपूरच्या 'कॅप्टन हाऊस' या टीव्ही शोमध्ये काम केले होते.
नेहाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९९ मध्ये 'प्यार कोई खेल नहीं' या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
'मे आय कम इन मॅडम?' (May I Come In Madam?) आणि 'भाभीजी घर पर है!' (Bhabiji Ghar Par Hain!) यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत, ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.
नेहा 'बिग बॉस १२' (Bigg Boss 12) ची स्पर्धक देखील होती.
नेहाने २०२० मध्ये शार्दुल ब्यास या उद्योगपतीशी लग्न केले.