आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर

By देवेंद्र जाधव | Updated: June 10, 2025 15:29 IST2025-06-10T15:08:40+5:302025-06-10T15:29:48+5:30

पुण्यात राहणारी आणि मुळशी पॅटर्न सिनेमात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री इंग्लंडमधून ग्रॅज्युएट झाली असून तिचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे. या अभिनेत्रीचं सर्वांनी कौतुक केलंय.

'मुळशी पॅटर्न' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टर प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलं. याच सिनेमात अभिनेत्री मालविका गायकवाडने राहुल्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली. या सिनेमात मालविकाने चहावालीची भूमिका साकारली.

मालविका गायकवाडने नुकतीच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. मालविका जगातील प्रतिष्ठित अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाली

मालविकाने ऑक्सफोर्ड बाहेरचा फोटो पोस्ट करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी कळताच सर्वांनी मालविकाचं अभिनंदन केलं आहे.

'मुळशी पॅटर्न'नंतर मालविकाने अभिनय क्षेत्र सोडलं आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. हंप्टी A 2 फार्म या बिझनेसमधून मालविका दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करते

मालविकाने तिच्या मित्रांसोबत हा व्यवसाय सुरु केला असून तिने टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शार्क टँक शोमधून या व्यवसायासाठी फंडींग उचललं होतं. मालविकाच्या हुशारीचं तेव्हा अनेकांनी कौतुक केलं.

अशाप्रकारे अभिनय क्षेत्र जरी सोडलं असलं तरी मालविकाने व्यवसायाची वेगळी वाट निवडली. आणि हे सर्व करता करता ती पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापाठीत गेली

आता मालविका पदवीधर झाली आहे. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर आज मालविका शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही यशस्वी आहे. मालविकाने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केलाय.