हॅपी बर्थ डे मुक्ते...!! पाहा, वेड लावतील मुक्ता बर्वेचे हे काही खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 13:18 IST2020-05-17T13:02:15+5:302020-05-17T13:18:54+5:30
तुमची आमची लाडकी मुक्ता अर्थात अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस.

17 मे 1979 रोजी पिंपरी चिंचवड येथे मुक्ताचा जन्म झाला. मुक्ताचे वडिल टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरीला होते आणि आई शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. पण मुक्ताला मात्र अभिनेत्री व्हायचे होते.
शालेय जीवनात अनेक नाटकात काम केल्यानंतर दहावी झाले आणि पूर्णवेळ अभिनय करायचा निर्णय मुक्ताने घेतला.
थिएटर या विषयात पदवी आणि ‘ड्रामा’ या विषयातून तिने बॅचलर डिग्री मिळवल्यानंतर मुक्ताने पूर्णवेळ अभिनयाला वाहून घेतले.
मुक्ता पुणे सोडून मुंबईमध्ये गर्ल्स हॉस्टेलला येऊन राहिली.
1999 साली ‘घडलंय बिघडलंय’ या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. तिचे पहिले नाटक होते ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’.
2002 मध्ये मुक्ताला पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमाचे नाव होते ‘चकवा’.
पहिल्या चित्रपटानंतर मुक्ताने कधीच मागे वळून पाहिले नाही.
थांग, सावर रे, माती माय, एक डाव धोबी पछाड, बदाम राणी गुलाम चोर, ऐका दाजीबा, हायवे, मंगलाष्टक वन्स मोअर, जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई - 2, डबल सिट असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मुक्ताने दिले.
मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील मुक्ता आणि स्वप्नील जोशीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.
‘जोगवा’ ही मुक्ताची अप्रतिम कलाकृती म्हणता येईल. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मुक्ता खºया अर्थाने लोकप्रिय झाली.
मुक्ताचा भाऊ सुद्धा एक व्यावसायिक कलाकार आहे.