साधीभोळी माझी आई! पोरं सुपरस्टार असूनही 'या' कलाकारांच्या आई राहतात अत्यंत साध्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 12:16 PM2023-05-14T12:16:53+5:302023-05-14T12:21:01+5:30

mother day 2023: सायलीची आई प्रचंड साधी असून ती तितकीच गोड असल्याचं दिसून येतं.

स्वप्नील जोशी - एकेकाळी मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नीलला ओळखलं जात होतं. स्वप्नील आजही लोकप्रिय अभिनेता आहे. विशेष म्हणजे आजही स्वप्नील त्याच्या कमाईचे सगळे पैसे आईच्या हातात ठेवतो.

सोनाली कुलकर्णी - मराठी कलाविश्वाची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिच्या आईचं नाव सविंदर असं आहे. त्या माहेरच्या पंजाबी असून सोशल मीडियावर त्यांचा फारसा वावर नाही.

विराजस कुलकर्णी- विराजसची आई कोण हे साऱ्यांनाच ठावूक आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी त्याची आई असून या मायलेकाची जोडी विशेष लोकप्रिय आहे.

सिद्धार्थ जाधव- आपला लाडका सिद्धू म्हणजे सिद्धार्थ जाधव याची आई प्रचंड साधी आहे. सिद्धार्थ बऱ्याचदा त्याच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असतो.

अमृता खानविलकर - अमृताच्या आईला साऱ्यांनीच पाहिलं असेल. अमृता बऱ्याचदा तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते. तिची आई अत्यंत साधी आणि तितकीच मनमिळाऊ असल्याचं लक्षात येतं.

सई ताम्हणकर - सई ताम्हणकरची आईदेखील सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. परंतु, या मायलेकींमध्ये मैत्रीचं नातं असल्याचं लक्षात येतं.

सायली संजीव- सायलीची आई प्रचंड साधी असून ती तितकीच गोड असल्याचं दिसून येतं.