'दे धक्का'फेम गौरीला ओळखणं आता आहे कठीण; १४ वर्षात झालीये कमालीची सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 10:44 AM2022-07-11T10:44:04+5:302022-07-11T10:53:10+5:30

Gauri vaidya: 'दे धक्का' चित्रपटानंतर गौरीने 'शिक्षणाचा आयचो घो' या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली.

मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेला 'दे धक्का' हा चित्रपट कोणत्याही प्रेक्षक विसरणं शक्य नाही.

२००८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.

या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत आपली छाप प्रेक्षकांवर पाडली.

या चित्रपटात दिग्गज कलाकारांच्या यादीत सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या दोघांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १३-१४ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, त्याची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर असल्याचं पाहायला मिळते. विशेष म्हणजे या कलाकारांमध्ये आता बराचसा बदल झाला आहे. त्यामुळे चित्रपटातील गौरी आता कशी दिसते, ती काय करते ते जाणून घेऊयात.

या चित्रपटात गौरीने सादर केलेली शुक्राची चांदणी ही लावणी तुफान गाजली. या लावणीमुळे ती विशेष चर्चेत आली.

परंतु, या चित्रपटानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. इतकंच नाही तर ती सोशल मीडियावरही फारशी सक्रीय नाही.

गौरी आता मोठी झाली असून तिच्यात कमालीचा बदल झाला आहे. गौरीने मुंबईतील माटुंगा येथील डी.जी. रुपारेल कॉलेजमधून इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी'मध्ये पदवी घेतली आहे

'दे धक्का' चित्रपटानंतर गौरीने 'शिक्षणाचा आयचो घो' या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. २०११ मध्ये 'एकापेक्षा एक जोडीचा मामला' ह्या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली होती.

२०१५ साली तिने आवाहन चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यांत तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. (All photos: gauri vaidya facebook page/social media)