घाऱ्या डोळ्यांची, गोड गळ्याची नायिका! मराठीत नाव कमावलं अन् झाली गायब, आता ओळखणंही कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:31 IST2026-03-10T13:18:16+5:302026-03-10T13:31:49+5:30
'आमच्यासारखे आम्हीच' सिनेमातील 'ही' अभिनेत्री आठवतेय?कुठे गायब झाल्या रेखा राव; आता 'अशा' दिसतात

मराठी चित्रपटांची आवड असणाऱ्या प्रत्येक सिनेरसिकाला माहिती असलेले नाव म्हणजे अभिनेत्री रेखा राव. त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि आजही सिनेरसिकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहेत.

अभिनेत्री रेखा राव मराठीसह हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटली.'धरलं तर चावतंय', 'प्रेम करूया खुल्लमखुल्ला', 'शुभ मंगल सावधान', 'आमच्यासारखे आम्हीच' हे गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींचा दबदबा असतानाही रेखा राव यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आपले वेगळे स्थान निर्माण केलं होतं.

रेखा यांना अगदी बालपणापासून नृत्याची आवड होती. किशोर कुमार यांच्या समोर परफॉर्म करायला संधी त्यांना मिळाली होती.

अभिनेत्री रेखा राव या मूळच्या बँगलोरच्या. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट होता 'नाम बडे'.

मराठीमध्ये अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची जोडी हिट ठरली. तसेच 'हम दिल दे चुके सनम', 'तेहजीब' 'हिरोज' यांसारख्या सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या.

गेल्या अनेक वर्षांपासून रेखा राव मराठी तसेच हिंदी सृष्टीपासून दूर आहेत. सध्या त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तसेच मालिकेत त्या काम करत आहेत.

बँगलोरमध्येच त्या आपल्या कुटुंबासोबत राहतात. रेखा राव यांचा आजही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. पूर्वीप्रमाणे आजही त्या तितक्याच सुंदर दिसतात.

















