'काजळ लावूनी आले मी आज, असं नका पाहू येते मला... ' अप्सरेच्या निरागस सौंदर्याची जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 05:13 PM2024-04-08T17:13:30+5:302024-04-08T17:20:33+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्तीवातील आघाडीची नायिका आहे.

मराठी मनोरंजन सृष्टीतील 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं.

दमदार अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर सोनालीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

'गाढवाचं लग्न', 'क्षणभर विश्रांती', 'अजिंठा', 'मितवा',' नटरंग', पोश्टर गर्ल', 'हिरकणी' या सिनेमांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोनाली तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.

नुकतेच सोनालीने राखाडी रंगाची साडी परिधान करून सुंदर फोटोशूट केलं आहे.

या पारंपरिक लूकमध्ये सोनाली फारच सुंदर दिसत आहे. शिवाय राखाडी रंगाच्या साडीवरील तिचा ब्लाऊज विशेष आकर्षण ठरत आहे.

नक्षीदार कलाकृतीच्या माध्यमातून या ब्लाऊजवर रेखीव आरीवर्क केल्याचं पाहायला मिळतंय.