आता काय करते 'गाढवाचं लग्न' मधील राजकन्या सत्यवती? सौंदर्याची प्रेक्षकांना पडलेली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:19 IST2025-08-13T18:05:35+5:302025-08-13T18:19:43+5:30

'गाढवाचं लग्न' चित्रपटात राजकन्या सत्यवती साकारणारी अभिनेत्री आठवतेय? सध्या काय करते, जाणून घ्या...

'गाढवाचं लग्न' हा सिनेमा मराठी चित्रपटाच्या इतिहासातील एक ब्लॉकबस्टर सिनेमा आहे.

अभिनेते मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २००७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन इतकी वर्ष उलटली तरी त्याची जादू काही कमी झालेली नाही. आज एवढ्या वर्षानंतरही प्रेक्षकांची या चित्रपटाला पसंती मिळते.

'गाढवाचं लग्न' मध्ये मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे यांच्याबरोबर अभिनेते संजय खापरे, समीरा गुजर, शरद पोंक्षे या कलाकारांनी देखील भूमिका साकारल्या होत्या.

दरम्यान, या चित्रपटात मिथिला नगरीची राजकन्या सत्यवतीची भूमिका अभिनेत्री समीरा जोशीने साकारली होती. तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.

आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांना भुरळ घातली.

त्यानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीत फारशी सक्रिय दिसली नाही. दरम्यान, समीरा अलिकडेच 'आय एम सॉरी' या सिनेमात आणि 'रानबाजार' या वेबसीरिजमध्ये झळकली.

त्यानंतर ही अभिनेत्री 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत झळकली. एकेकाळी उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे प्रेक्षकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री आता युट्यूबर देखील सक्रिय असल्याची पाहायला मिळते.