"तुम पर मरती हूँ, मैं सच कहती हूँ..."; प्रार्थना बेहरेने हटके अंदाजात दिल्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:27 IST2025-01-17T16:16:21+5:302025-01-17T16:27:06+5:30

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रार्थना बेहरे ही मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली. त्यानंतर प्रार्थना बेहरेने कधीच मागे वळून पाहिलं.

वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमध्ये तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

सध्या प्रार्थना बेहरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे अभिनेत्री तिचा नवरा अभिषेक जावकरसाठी इन्स्टाग्रावर एक रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे.

लाडक्या नवरोबाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने रोमॅंटिक अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

"तुम पर मरती हूँ, मैं सच कहती हूँ..., हॅप्पी बर्थडे माय लव्ह!" असं कॅप्शन प्रार्थना बेहरेने या व्हिडीओला दिलं आहे. तिच्या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी कमेंट्चा वर्षाव केला आहे.

दरम्यान, प्रार्थना बेहेरेने १४ नोव्हेंबर २०१७ मध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. प्रार्थना बेहरेचा नवरा अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.

प्रार्थना आणि अभिषेक यांच्या सुखी संसाराला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत.