"स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..." पूजा सावंतच्या दिवाळी स्पेशल लूकची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 13:49 IST2024-11-01T13:40:44+5:302024-11-01T13:49:31+5:30
अभिनेत्री पूजा सांवतने दिवाळीनिमित्ताने खास अंदाजात फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.

दिवाळीनिमित्ताने सगळीकडे उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे.
संपूर्ण परिसर हा लक्ष लक्ष दिव्यांनी, पानाफुलांच्या तोरणांनी, झगमगत्या रोषणाईने उजळून निघाला आहे.
सर्वसामन्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही हा आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर मराठी अभिनेत्रींच्या दिवाळी स्पेशल लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
अशातच मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिवाळीनिमित्त केलेलं फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
पूजा अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. पूजा तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी नेसून नटली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
त्यासोबत मोकळे केस, गळ्यात खड्यांचा नेकलेसने पूजाच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.