आताही तितकीच सुंदर दिसते 'झपाटलेला' सिनेमातील लक्ष्याची आवडी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:54 IST2026-01-27T17:27:09+5:302026-01-27T17:54:43+5:30

'झपाटलेला' सिनेमातील लक्ष्याची ऑनस्क्रिन प्रेयसी आठवतेय? आता फारच बदलली अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीत आजवर असे अनेक चित्रपट आले जे आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीतील एक नाव म्हणजे 'झपाटलेला'.

१६ एप्रिल १९९३ ह्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याकाळी या सिनेमातील कलाकारांचा अभिनय आणि त्यातील तात्या विंचू हे पात्र सुद्धा गाजलं.

'झपाटलेला' सिनेमात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ऑनस्क्रिन प्रेयसीची भूमिका अभिनेत्री पूजा पवार यांनी साकारली होती. या भूमिकेतून त्या आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवण्यात यशस्वी ठरल्या.

या चित्रपटात त्या अगदी साध्या अंदाजात दिसल्या होत्या. पण रिअल लाईफमध्ये त्या खूपच ग्लॅमरस आहेस.

सध्या पूजा पवार स्टार प्रवाह वाहिनीवरील 'हळद रुसली, कुंकू हसलं' या मालिकेत काम करताना दिसत आहे.

या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाई नावाचं पात्र साकारत आहे.

अभिनेत्री पूजा पवार आपल्या अभिनयासह सोशल मीडियावर हल्ली सक्रिय आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट् तसेच फोटो, व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.