'फॅण्ड्री' सिनेमातील शालू आता दिसते भलतीच सुंदर! १२ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:07 IST2026-02-13T11:44:21+5:302026-02-13T12:07:50+5:30
'फॅण्ड्री' सिनेमातील शालू आठवतेय? अभिनेत्री दिवसेंदिवस होत चाललीये ग्लॅमरस

२०१४ साली आलेला 'फॅण्ड्री' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरातला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून ती महाराष्ट्रीतील घराघरात पोहोचली.

'फॅण्ड्री' प्रदर्शित होऊन आता साधारण १२ वर्ष उलटली आहेत. मात्र, आजही चित्रपटातील जब्या आणि शालूची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही लोक तिला शालू म्हणूनच ओळखतात.

'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरी अगदी साध्या अंदाजात दिसली होती. पण रिअल लाईफमध्ये ती खूपच ग्लॅमरस आहे.

मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियाव कमालीची सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिला लाखो लोक फॉलो करतात.

नुकतेच तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर खास फोटो शेअर केले आहेत. सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान करून हटके अंदाजातील तिने हे फोटो क्लिक केले आहेत.

राजेश्वरी खरात या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत असून तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

















