'फॅंड्री'तील शालूची सोशल मीडियावर हवा; खणाच्या साडीमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:24 IST2024-12-13T15:05:03+5:302024-12-13T15:24:37+5:30

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फॅंड्री' हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला.बॉक्स ऑफिसवरही 'फँड्री' चांगलाच गाजला.

या चित्रपटाप्रमाणे त्यातील शालू आणि जब्याच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली.

'फॅंड्री'मध्ये सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे नवोदित कलाकार झळकले होते.

आता 'फँड्री'मधील हे दोन्ही कलाकार मोठे झाले आहेत. शिवाय सोशल मीडियावरही ते दोघे नेहमी सक्रिय असतात.

दरम्यान, नुकताच इन्स्टाग्रामवर अभिनेत्री राजेश्वरी खरातने तिचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

निळ्या रंगाची खणाची साडी त्यावर साजेसा नेकलेस शिवाय केस मोकळे सोडून राजेश्वरीने हा व्हिडीओ शूट केला आहे.

"Timeless elegance wrapped in tradition..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

राजेश्वरी या पारंपरिक लूकमध्ये फारच सुंदर दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.