मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर हवा! बिकिनी लूकमध्ये शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:23 IST2024-11-30T15:15:36+5:302024-11-30T15:23:11+5:30

केशरी रंगाच्या बिकिनीमधील ही अभिनेत्री आहे तरी कोण?

मराठमोळ्या अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर हवा आहे. परदेशात फिरत असताना तिच्या बिकिनी लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

ही अभिनेत्री आहे विदुला चौगुले (Vidula Chougule). नेहमी सोशल मीडियावर हॉट अँड ग्लॅमरस अंदाजात दिसणारी विदुला कुठे फिरतेय?

विदुला सध्या व्हिएतनाम येथे व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. समुद्रात बोटिंगचा आनंद घेतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. तिच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

विदुलाने केशरी रंगाची बिकीनी परिधान केली आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचा स्टोल आहे. विदुला या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

याशिवाय तिने आणखी काही फोटोत व्हिएतनामचा सुंदर नजारा दाखवला आहे. गुलाबी टॉप, ब्लॅक शॉर्ट्स आणि गुलाबी जॅकेटमध्ये तिने हा फोटो शेअर केला आहे.

व्हिएतनाममध्ये फिरत असताना विदुला फॅशन गोल्स सेट करत आहे. अबोली रंगाच्या एका स्टायलिश ड्रेसमध्ये तिने घेतलेला सेल्फी क्युट दिसतोय.

विदुलाचे इन्स्टाग्रामवर २ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोंवर कायम लाईक्सचा वर्षाव होतो. आपल्या सौंदर्याने आणि टोन्ड फिगरने सर्वांना घायाळ करत असते.

विदुलाने 'जीव झाला येडापिसा' मालिकेत काम केलं होतं. शिवाय ती 'बॉईज 3 सिनेमातही झळकली होती.