जशी माय तशी लेक! सोनाली खरेच्या मुलीचे 'हे' ग्लॅमरस फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 12:16 PM2021-09-12T12:16:48+5:302021-09-12T12:26:31+5:30

Sanayaah Anand : सोनालीच्या लेकीचं नाव सनाया आनंद असून ती देखील आपल्या आईप्रमाणे लोकप्रिय होत आहे.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे.

आजवर असंख्य चित्रपटात काम केलेली सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती तिच्या लेकीसोबतचे फोटो शेअर करत असते.

सोनालीच्या लेकीचं नाव सनाया आनंद असून ती देखील आपल्या आईप्रमाणे लोकप्रिय होत आहे.

सनायाने अलिकडेच एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. ‘ब्लड रिलेशन’ असं तिच्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे.

विशेष म्हणजे कमी वयात सनायाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियाचा आधार घेते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली सनाया अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नऊवारी साडीत सनायाचं सौंदर्य खुललं असून तिने फोटोसाठी खास पोझ दिली आहे.

अनेकदा वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटो शेअर करणारी सनाया पारंपरिक नऊवारी साडीतही तितकीच सुंदर दिसते.