श्वेता शिंदेने जपली परंपरा; थाटात केला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, पाहा photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:19 IST2024-02-19T17:16:41+5:302024-02-19T17:19:42+5:30
Shweta shinde: श्वेता कायम तिच्या लूक आणि पर्सनालिटीमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे (Shweta Shinde).
आजवर श्वेताने अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांची निर्मिती केली आहे. लागिरं झालं जी, देवमाणूस या तिच्या मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजल्या.
उत्तम कथानकासह मालिका सादर करणारी श्वेता खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते.
यावेळी श्वेता तिच्या हळदीकुंकू समारंभामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच श्वेताने तिचं हळदीकुंकू केलं. यावेळचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्वेताने हळदीकुंकूसाठी खास काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे.
श्वेताच्या या लूकची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.
श्वेता कायम तिच्या लूक आणि पर्सनालिटीमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
श्वेताने फोटोसाठी छान पोझ दिल्या आहेत.