स्मिता पाटील इज बॅक! रिंकू राजगुरुचे साडीतील फोटो पाहताच नेटकऱ्यांना आली दिवंगत अभिनेत्रीची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:52 IST2022-04-12T18:49:33+5:302022-04-12T18:52:49+5:30
Rinku rajguru:रिंकूचं हे नवं फोटोशूट पाहिल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर कमेंटचा पाऊस पाडला. मात्र, एका नेटकऱ्याची कमेंट लक्षवेधी ठरली.

सैराट, कागर, मेकअप आणि झुंड या चित्रपटांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
कमी वयात रिंकूने अमाप यश आणि प्रसिद्धी अनुभवली आहे. त्यामुळे आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.
कलाविश्वात सतत वावर असणाऱ्या रिंकूचा गेल्या काही काळात सोशल मीडियावरील वावरही वाढला आहे.
झुंड चित्रपटाच्या प्रमोशन काळात रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय झाल्याचं दिसून आलं.
सध्या रिंकू अनेकदा तिचे साडीतील फोटो शेअर करताना दिसत आहे.
अलिकडेच रिंकूने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या साडीत एक फोटोशूट केलं.
रिंकूचं हे नवं फोटोशूट पाहिल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर कमेंटचा पाऊस पाडला. मात्र, एका नेटकऱ्याची कमेंट लक्षवेधी ठरली.
रिंकूचा फोटो पाहिल्यावर एका युजरला दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण झाली. त्यांमुळे स्मिता पाटील इज बँक अशी कमेंट या नेटकऱ्याने केली आहे.