'मी बघीन नाही तर काय बी करीन...'; रिंकूच्या बोल्ड लूकवर नेटकऱ्यांच्या सैराट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 11:23 IST2024-04-21T10:50:05+5:302024-04-21T11:23:12+5:30
Rinku rajguru: रिंकूने तिच्या या ग्लॅमरस लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रिंकू अल्पावधीत लोकप्रिय झाली.
सैराट हा रिंकूचा पहिला सिनेमा. नागराज मंजुळे यांच्या या सिनेमाच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.
रिंकूने आजवर कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा यांसारख्या अनेक सिनेमा, वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.
रिंकू कायम मराठमोळा लूक करुन नेटकऱ्यांची मन जिंकत असते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच तिने वेस्टर्न लूक ट्राय करुन पाहिला.
अलिकडेच रिंकूने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने ग्लॅमरस लूक केला होता.
रिंकूला पहिल्यांदाच ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.तर, काहींनी तिचं कौतुक केलं आहे.
रिंकूने तिच्या या ग्लॅमरस लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
डीपनेक कलरफुल गाऊन, गळ्यात सुंदर डायमंड नेकलेस, सिल्व्हर रंगाचे कानातले, शॉर्ट हेअरकट आणि ग्लॅमरस मेकअप असा लूक तिने केला होता.