क्या खूब लगती हो..! Bold expression देत प्रियाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 18:25 IST2024-03-06T18:19:53+5:302024-03-06T18:25:48+5:30
Priya bapat: प्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून अलिकडेच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रियाने मराठी कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे.
बालकलाकार म्हणून प्रियाने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
प्रियाने वजनदार, आम्ही दोघी, टाइमपास 2, काकस्पर्श, हॅप्पी जर्नी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
प्रियाने लोकप्रिय अभिनेता उमेश कामत याच्यासोबत लग्न केलं आहे. प्रिया आणि उमेश या दोघांकडे लोकप्रिय जोडी म्हणून पाहिलं जातं.
प्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
कधी पारंपरिक वेशात तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटो शेअर करत प्रिया चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
यावेळी तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यात तिने बोल्ड एक्स्प्रेशन्स दिल्यामुळे नेटकऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.
प्रियाच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली आहे.